पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त श्रीरामपूर भाजपा तर्फे विविध ठिकाणी वृक्षारोपण ; वृद्धांसाठी फिरवली झोळी


श्रीरामपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस व सेवा पंधरवडानिमित्त भारतीय जनता पक्ष श्रीरामपूरतर्फे महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, प्रशासकीय भवन व माऊली वृद्धाश्रम येथे वृक्षरोपण तसेच माऊली वृद्धाश्रमाला बेडशीट व किराणा सामुग्री भेट म्हणून देण्यात आली.

भाजप तालुकाध्यक्ष दीपक पटारे, पोलीस निरीक्षक गवळी, नायब तहसीलदार वाकचौरे, गिरीधर आसने, सुनील वाणी, सुनील साठे, नानासाहेब शिंदे, गणेश मुदगुले, माजी उपसभापती बाळासाहेब तोरणे, केतन खोरे, जितेंद्र छाजेड, सतीश सौदागर, गणेश राठी, शहराध्यक्ष मारुती बिंगले, दत्तात्रय जाधव, नितीन भागडे, महेंद्र पटारे, रामभाऊ लिपटे, भाऊसाहेब बांदरे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना भाजप तालुकाध्यक्ष दीपक पटारे म्हणाले की, सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करतात. त्यांच्यामुळे देशाचा जगात लौकिक वाढला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पर्यावरण आणि सामान्य माणसांसाठी सेवा पंधरवडा निमित्त उपक्रम राबविण्यात आले. महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा श्रीरामपूर तालुक्यातील सामान्य नागरिकांना मोठा आधार आहे. जे लोकाभिमुख समर्पक कार्य देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे सहकारी करत आहेत. तेच कार्य राज्यात भाजप-शिवसेना सरकार करत आहे. त्याच पद्धतीने श्रीरामपुरात जनतेच्या समस्या सोडविण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत. निराधार वृद्धांना मायेने सांभाळण्याचे पुण्यकर्म माऊली वृद्धाश्रमात चालते. यानिमित्ताने वृद्धाश्रमाच्या कार्यात हातभार लावण्याचे भाग्य आम्हाला लाभल्याचे पटारे म्हणाले.

यावेळी प्रफुल्ल डावरे, मनोज नवले, रुपेश हरकल, अनिल थोरात, विशाल अंभोरे, राधाकृष्ण आहेर, प्रवीण लिपटे, रणजित बनकर, मिलिंदकुमार साळवे, शंकरराव मुठे, बाबासाहेब चिडे, बंडूकुमार शिंदे, रामभाऊ जगताप, महेश खरात, शंतनू फोपसे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

दीपक पटारेंनी वृद्धांसाठी फिरवली झोळी

माऊली वृद्धाश्रमातील निराधार वृद्धांना मदत व्हावी या हेतूने भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांनी मदतीचे केवळ आवाहन न करता चक्क झोळी फिरविली. वृद्धांसाठी पटारे यांनी फिरवलेल्या झोळीत भाजप कार्यकर्त्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. अनपेक्षितपणे मिळालेल्या मदतीमुळे माऊलीच्या वृद्धांना गहिवरून आले. पटारे यांनी प्रत्येक वृद्धाची व्यक्तिगत विचारपूस करत आशीर्वाद घेतले.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post