विखे पाटलांच्या पालकमंत्री पदाचा श्रीरामपुरात पेढे वाटून जल्लोष


श्रीरामपूर : महाराष्ट्र राज्याचे महसूल, दुग्धविकास, पशुसंवर्धन मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांची अहमदनगर व सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल श्रीरामपूरात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटून जल्लोष केला. यावेळी एकात्म मानवतावाद व अंत्योदयाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्यात आली. तर केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद पटेल व महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या श्रीरामपूर दौरा तयारीची बैठक ज्येष्ठ नेते शशिकांत कडूस्कर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडल्याची माहिती भाजप तालुकाध्यक्ष दीपक पटारे यांनी दिली.

 यावेळी जिल्हा सरचिटणीस सुनील वाणी, शहराध्यक्ष मारुती भिंगले, जिल्हा उपाध्यक्ष गणेश राठी, रामभाऊ तरस, सतीश सौदागर, जिल्हा सचिव अनिल भगडे ज्येष्ठ नेते गिरधर तात्या आसने, विठ्ठल राऊत, माजी नगरसेवक जितेंद्र छाजेड, केतन खोरे,डॉ.शंकर मुठे, सुनील साठे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष दत्ता जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना दीपक पटारे म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर शहर व तालुक्याचा सर्वांगीण विकास करणे आमचे ध्येय आहे. पालकमंत्री पदामुळे विकास कामांना चालना देत सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करता येणार आहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या २९ तारखेला होणाऱ्या श्रीरामपूर दौऱ्यानिमित्त प्रमुख कार्यकर्त्यांची आढावा बैठक यावेळी पार पडली. केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांचा मेळावा दुपारी १२ वाजता स्वयंवर मंगल कार्यालय तर शहरातील व्यापारी, उद्योजक, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, वकील, केमिस्टसह नागरिकांची बैठक दुपारी २ वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह, छत्रपती शिवाजी महाराज रोड, नगरपरिषद येथे संपन्न होणार असल्याची माहिती पटारे यांनी दिली.

यावेळी विखे पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मांडण्यात आला. यावेळी रामभाऊ लिप्टे, महेश खरात, प्रफुल्ल डावरे, मुकुंद हापसे, प्रवीण लिप्टे, आसिफ पोपटीया, उद्योजक जितेंद्र तोरणे,महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुप्रिया धुमाळ, रवी पंडित, संचित गिरमे, लक्ष्मणराव पवार, विजय आखाडे, अनिल थोरात, रुपेश हरकल, पंकज करमासे, जयदिप आसने यांच्यासह भारतीय जनता पार्टी श्रीरामपूर शहर व तालुकाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post