बेलापूर : गाव संरक्षणात गणेश विसर्जन शांततेत पार पाडून बेलापूर गावाने समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. अशा प्रकारे सर्वांनी कृती केल्यास पोलीस खात्यावरील वाढता ताण निश्चितच कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी व्यक्त केला.
बेलापुर ग्रामपंचायतीच्या शतक महोत्सव व गणेशोत्सवाचे औचित्य साधुन देखावा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न व्हावा, अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. त्यामुळे त्यांना निमंत्रण देण्यासाठी गावातील शिष्टमंडळ अहमदनगर येथे गेले होते. गावाने आत्तापर्यत वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले असुन सर्वधर्मिय प्रार्थना स्थळावरील भोंग्यांवर राष्ट्रगीत लावण्यात आले होते. १५ ऑगस्टचे ध्वजारोहन सर्वधर्मिय संत महंताच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर गणेशोत्सव दरम्यान जिवंत देखाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच पोलीस बंदोबस्ताशिवाय गणेश विसर्जन मिरवणूक काढण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता. सर्व गणेश मंडळ व गणेश भक्तांच्या सहकार्यातुन कसलेही विघ्न न येता मिरवणूक शांततेत पार पडली. त्यामुळे आपण देखावा स्पर्धेच्या बक्षिस वितरण कार्यक्रमास उपस्थित रहावे, अशी विनंती जि. प. सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे यांनी केली. चांगले उपक्रम राबविणारे गाव म्हणून बेलापुरची ओळख असुन या कार्यक्रमास निश्चितच येईल, असे अश्वासन पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी शिष्टमंडळाला दिले. या शिष्टमंडळात जि. प. सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, पत्रकार देविदास देसाई, गांवकरी पतसंस्थेचे चेअरमन साहेबराव वाबळे, भाजपाचे सरचिटणीस प्रफुल्ल डावरे, गांवकरी पतसंस्थेचे संचालक अजिज शेख, मोहसीन सय्यद, दादासाहेब कुताळ आदिंचा समावेश होता.
बेलापूर ग्रामपंचायतीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा; ग्रामस्थांची मागणी
बेलापूर ( प्रतिनिधी )बेलापुर व परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या अचानक वाढली असुन या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
गेल्या काही दिवसापासून गावात मोकाट कुत्रे गल्लोगल्ली फिरताना दिसत आहेत अज्ञात वहानातुन पहाटेच्या वेळेस टेम्पोतुन हे कुत्रे बाजार तळाजवळ सोडण्यात आल्याचे काही नागरीकांनी पाहीले आहे आता टेम्पोतुन आणलेले हेच कुत्रे टोळक्याने गावात फिरत आहे गावातील कुत्री व नव्यानेच गावात दाखल झालेली कुत्री एकमेकावर हल्ले करत आहे . या मोकाट कुत्र्यापासुन लहान मुले तसेच जनावरांना धोका आहे .मागे काही दिवसापूर्वी अशाच प्रकारे प्रवरा पुलाजवळ कुत्रे सोडण्यात आले होते त्या वेळी नागरीकांच्या तक्रारीवरुन ग्रामपंचायतीने मोकाट कुत्री पकडून बाहेरगावी सोडली होती त्याच पध्दतीने पुन्हा मोकाट कुत्रे पकडून न्यावेत अशी ग्रामस्थांची मागणी आहे या बाबत नुकतेच बेलापुर ग्रामपंचायतीने श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिलेली असुन त्या तक्रारीतही अज्ञात वाहनातुन ही कुत्री सोडण्यात आली असल्याचे म्हाटले आहे.