उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण


श्रीरामपूर : श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वळदगाव-उंबरगाव येथील जागृत देवस्थान काळभैरवनाथ मंदिर येथे मंदिर परिसरात वृक्षरोपण करण्यात आले. श्री.पवार यांनी काळभैरवनाथांचे दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले.

               याप्रसंगी वळदगाव-उंबरगाव ग्रामस्थांच्या वतीने श्री.पवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील, अशोक साखर कारखान्याचे संचालक हिम्मतराव धुमाळ, पोलिस पाटील शिवाजी भोसले, ट्रस्टचे अध्यक्ष बाबासाहेब कोळसे, विलास जाधव, सरपंच किशोर कांडेकर, विराज भोसले उंबरगाव सोसायटीचे चेअरमन रवींद्र झरेकर, दिपक झरेकर, राजेंद्र ओहोळ, नायब तहसीलदार राजवाळ, मंडल अधिकारी मंडलिक, कदम, कामगार तलाठी अशोक थोरात, अ‍ॅड्.सौ.लिप्टे आदि मान्यवर उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post