येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष संदिप मगर, पदाधिकरी रितेश एडके, राहुल कापसे, कृष्णा सरदार, गोरख आढाव, संतोष मोकळ, आण्णासाहेब झीने, सुनील संसारे, आंबादास निकाळजे, रॉकी लोंढे, सुमेध पडवळ, शुभम लोळगे, शिवाजी शिंदे, कैलास ठोंबरे, फिरोज पठाण, सुरेश ठुबे, अण्णासाहेब शरणागते व चरण त्रिभूवन आदी उपसथित होते.
सुभाष त्रिभूवन यावेळी म्हणाले, उद्या २९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी भोसले यांनी श्रीरामपूरचे मुख्याधिकारी, अहमदनगरचे वनउपसंरक्षक उपविभागीय अधिकारी, भुमी अभिलेखचे उपअधिक्षक व समितीचे पदाधिकारी यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत पुतळ्याच्या उभारणीस अधिकृत परवानगी दिली जाणार आहे. याबाबत माहिती समजताच श्रेयवादी पुढकाऱ्यांना पोटसूळ उठला असून त्यांनी याचे श्रेय आपल्याला मिळणार नसल्याचे पाहून त्याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर उपोषणाचा इशारा दिला आहे.
समितीच्या सदस्यांनी गेल्या पाच वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडर यांच्या यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासाठी समितीने मोठा संघर्ष केला. शासन दरबारी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची मोठ्या कसोशिने पूर्तता केली. त्यावेळी हे श्रेयवादी पुढारी कुठेही दिसले नाही. आता मात्र पुतळ्यासाठीचे सर्व सोपस्कर पूर्ण झाल्यानंतर त्यांना जाग आली आहे. त्यातूनच केवळ येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी काही दिवसांपूर्वी नगर परिषदेसमोर आंदोलन केले. मात्र नगर पालिकेने याबाबत सर्व पुर्तता करून हे प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयात पाठविले असल्याने त्यांचे हे आंदोलन फ्लॉप ठरले. त्यानंतर १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला मात्र त्यादिवशी कोणीही नगरला फिरकले नाही. आता श्रेय लाटण्यासाठी त्यांनी उद्या उपोषणाचा घाट घातला असल्याचा आरोप त्रिभूवन यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी केला.
तुम्हाला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याबद्दल खरच आस्था असेल तर गेल्या पाच वर्षांत तुम्ही कोठे होता. त्यासाठी काय पाठपुरावा केला, असा सवाल विचारून उद्या जिल्हाधिकाऱ्यासमोर तुम्ही केलेल्या पाठपुराव्याची कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहनही त्रिभूवन व मगर यांनी केले आहे.