छावा स्वराज्य रक्षक सेनेच्या तक्रारीची प्रशासनाकडून दखल ; रस्त्याच्या कामाच्या चौकशीचे आदेश


श्रीरामपूर : श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथील बनसोडे वस्तीलगत दलित वस्ती योजनेंतर्गत काँक्रेटीकरण केलेल्या निकृष्ट रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याचे आदेश गट विकास अधिकाऱ्यांनी शाखा अभियंता व विस्तार अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासंदर्भात छावा स्वराज्य रक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष इम्रानभाई शेख व राजेश बोरुडे यांनी तक्रार केली होती.


         छावा स्वराज्य रक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष इम्रानभाई शेख व राजेश बोरुडे यांनी पढेगाव येथील बनसोडे वस्तीलगत दलित वस्ती योजनेंतर्गत काँक्रेटीकरण केलेला रस्ता निकृष्ट साहित्त्याचा वापर करून केलेला असून, या रस्त्याची कोअर कटिंग टेस्ट करावी व यात दोषी आढळणारे संबंधित अधिकारी व ठेकेदारावर गुन्हा दाखल करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषन करण्यात येईल, असा इशारा दिला होता.


           छावा स्वराज्य रक्षक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी 'बिडीओं'ना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, तालुक्यातील मौजे पढेगाव येथील बनसोडे वस्ती रोड ( दलित वस्ती ) रस्ता काँक्रेटीकरण केलेल्या कामात निकृष्ट मटेरीयल वापरून मोठा भ्रष्टाचार केलेला आहे. काँक्रेटीकरण रस्त्याच्या कामात अगोदर रब्बल सोलिंग करावी लागते. त्यात वापरलेला दगड विहिरीचा, कच्चा आहे. मुरूम मातीमिश्रित असून, सिमेंटचे प्रमाण अतिशय कमी आहे. या कामाची कोअर कटिंग टेस्ट करावी. या कामाचा गुणनियंत्रक विभागाने दाखला दिला असल्यास त्यांचीही चौकशी करावी. कारण, क्वालिटी कंट्रोल विभाग रस्त्याच्या साहित्त्याची तपासणी न करताच दाखले देत असल्याचा आरोप छावा स्वराज्य रक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष इम्रानभाई शेख व सामाजिक कार्यकर्ते राजेश बोरुडे यांनी केला होता.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post