साईकिरण टाइम्स | २६ जानेवारी २०२१
मालाड | प्रतिनिधी | दीपक जगझाप | कुरार व्हिलेज, मालाड ईस्ट, संतोषी माता मंदिर परिसरात ७१ वा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. माजी नगरसेवक व धडक कामगार सेनेचे अध्यक्ष अभिजित राणे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी संतोषी माता रिक्षा स्टॅन्डचे अध्यक्ष अशोक वर्मा, कुरार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी प्रकाश भेले, संतोषी माता रिक्षा स्टॅन्डचे उपाध्यक्ष मेहबूब शेख, धडक कामगार सेनेचे विजय शंकर मिश्रा, सुधीर पावसकर, मालाड भाजपा नगरसेवक विनोद मिश्रा, कमलेश संसारे, अरुण गुप्ता, नदीम शेख, रहीम शेख, सम्राट कामगार सेनेचे अध्यक्ष विजय डोंगरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी देशभक्तीपर गीतांनी परिसर दुमदुमून गेला होता.