साईकिरण टाइम्स | ८ डिसेंबर २०२०
श्रीरामपूर | दिल्ली येथे कृषी कायद्याविरोधात सुरू असलेले अखिल भारतीय किसान समन्वय समितीच्या वतीने सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठींबा देणेसाठी व शेतकरी विरोधी तीनही कृषि कायदे मागे घेण्याच्या प्रमुख मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरातील विविध राजकीय पक्ष व संघटनांच्या वतीने तहसिल कार्यालयावर निदर्शने करून निवेदन देण्यात आले.
यावेळी केंद्र सरकारने कुठल्याही चर्चेशिवाय घाईघाईने कृषी संबंधित अध्यादेश काढून त्यांचे कायद्यात केलेले रूपांतर व दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलकांवर सरकार करत असलेल्या दडपशाहीचा यावेळी सर्वानी निषेध केला. तसेच केवळ चर्चेचा दिखावा न करता शेतकरी विरोधी तीन ही कृषि कायदे तातडीने मागे घेण्यात यावे, आंदोलनावरील दडपशाही थांबविण्यात येऊन सदर प्रश्नी तातडीने मार्ग काढण्यात यावा, विज वितरण कंपन्यांचे खाजगीकरण करण्याचा निर्णय मागे घ्या यासह विविध मागण्यांचे निवेदन पंतप्रधान, केंद्रिय कृषि मंत्री यांना तहसीलदार, श्रीरामपूर यांच्या मार्फतीने पाठविण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रश्नी केंद्र सरकारने लवकरात लवकर मार्ग न काढल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी कामगार नेते नागेशभाई सावंत,श्रमिक शेतकरी संघटनेचे कॉ.जीवन सुरूडे, आम आदमी पक्षाचे तिलक डुंगरवाल, शिवसेनेचे सचिन बडदे, संविधान बचाव समितीचे अहमदभाई जहागीरदार, काँग्रेसचे ऍड. समिन बागवान, मराठा स्वयम् संघाचे राजेंद्र भोसले, आदींचे भाषणे झाली. यावेळी श्रीकृष्ण बडाख, लखन डांगे, विकास डेंगळे, किशोर वाडीले, अजय बत्तीसे, सुयोग सस्कर, अमोल सोनवणे, मिलिंद चक्रनारायण, राज यादव, अझर शेख, विष्णू भागवत, बी एम पवार, जलील शहा, आदींसह विविध पक्षाचे व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.