साईकिरण टाइम्स |२५ डिसेंबर २०२०
बेलापूर | प्रतिनिधी | कुणाचाही मुलाहिजा न ठेवता गैरवर्तन करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयपीएस पोलीस अधिकारी आयुश नोपाणी यांनी दिला.
ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावोगावी वातावरण तापू लागले आहे. त्या अनुषंगाने श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर ग्रामपंचायतीची निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी, बेलापूर पोलीस चौकीमध्ये स्थानिक पुढारी, पत्रकार व ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
नोपाणी पुढे म्हणाले, गाव म्हणजे एक मोठे कुटुंब आहे. त्याची सुखशांती भंग होणार नाही याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. एखादी समाजविघातक प्रवृत्ती गैरकृत्य करून निवडणुकीच्या कामात बाधा आणन्याचा प्रयत्न करत असेल, तर ताबडतोब पोलीसांना कळवा, आम्ही तात्काळ त्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करू. याचबरोबर आमच्याकडून कुठेही पक्षपात केला जाणार नाही, असे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुधीर नवले , माजी सरपंच भरत साळुंके , पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष सुनिल मुथ्था, सचिव देविदास देसाई , अशोक गवते , पोलीस पाटील अशोक प्रधान , शिवसेनेचे शहर प्रमुख अशोक पवार , बेलापूर खुर्दचे माजी उपसरपंच प्रा.अशोक बडधे , तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रकाश कुऱ्हे , अजय डाकले , द्वारकानाथ बडधे , पत्रकार सुहास शेलार , अशोक शेलार , किशोर कदम , दिलीप दायमा , पोलीस पाटील युवराज जोशी , कैलास चायल , यांचेसह पो.हे.कॉ.अतुल लोटके , पो.ना.रामेश्वर ढोकणे , पो.कॉ.निखिल तमनर व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.