दीवाळी अंकांची मागणी वाढल्याने साहित्त्य विश्वात उत्साहाचे वातावरण

श्रीरामपूर : येथील वृत्तपत्र विक्रेता मयुर पांडे यांच्या स्टॉलवर विविध दीवाळी अंक दिसत आहे.(छायाचित्र - अनिल पांडे)

_______________________________________
साईकिरण टाइम्स | १४ नोव्हेंबर २०२०
श्रीरामपूर ( अहमदनगर ) कोरोनामुळे आणि आर्थिक मंदीमुळे दीवाळी अंकाच्या प्रती कमी प्रमाणात प्रसिध्द झाल्याने मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती निर्माण झाली आहे. यंदा मागणी कमी असेल हि भिंती खोटी ठरल्याने दिवाळी साहित्त्यिक व्यवहारात उत्साहाचे  वातावरण आहे.

दिवाळी अंकाचा प्रवास यावर्षी ११३ वे वर्षात पदार्पण करत आहे. वाचकप्रिय, बुध्दवंताची वैचारीक समृध्दी वाढवण्यसाठी भुक भागवण्याचे काम होते ते दिवाळी अंकाने. मराठी वाड्मयीन विश्वात तर दिवाळी अंकानी साहित्यीकाच्या अनेक पिढ्या घडवल्या. अशा दिवाळी अंकाचा प्रवास ११३ वर्षाचा होत आहे. महाराष्ट्रात तब्बल तीन हजार अंक दरवर्षी प्रकाशीत होतात. ई- दिवाळी अंकाना ही मागणी वाढत आहे. २०० ते ३०० प्रकारचे दीवाळी अंक बाजारात दाखल झाले असल्याचे सर्ववृत्तपत्रांचे प्रमुख वितरक मयुर विजय पांडे , मिथुन किशोर पांडे यांनी सांगितले.

वाचक, लेखक, प्रकाशक, कामगार अशी सर्वांची पिढीच्या पिढी दिवाळी अंकांनी बांधून ठेवली आहे. दिवाळी अंकांची संख्या शंभरानी घटली आहे. करोनामुळे अंक कमी, तसेच प्रसिध्द झालेल्या अंकांची पृष्ठसंख्या कमी यामुळे प्रसिध्द झालेल्या अंकाची मागणी वाढली असल्याचे पांडे यांनी सांगितले.

दिवाळीपूर्वी प्रत्येकजन फराळाबरोबरच साहित्याच्या फराळाची आतुरतेने वाट बघत असत. याच दिवाळी अंकाना ११३ वर्षाची परंपरा लाभली असल्याने महाराष्ट्राच्या संस्कृतीत दिवाळी अंकाचे योगदान अमुल्य असे आहे. दिवाळी म्हटले की, फटाके, रांगोळ्या,फराळाचे सजलेले ताट या यादितच वाचन प्रेमी दिवाळी अंकांच्या मेजवाणीने अक्षर दिवाळी साजरी करतात. आपल्याला अभिप्रेत दिवाळी अंक हाती पडावा यासाठी वाचकांची दिवाळीच्या उत्सुकतेने वाट पाहतात. विविध विषयाचे दिवाळीअंक बाजारात आले आहे. 

दिवाळी अंक नेहमिच मराठी वाचकांच्या कक्षात रुंदावणारे ठरले आहे. येथील साहित्य हे तत्कालिन प्रगल्भ चळवळीतून नेहमिच समोर येत राहिले. दिवाळी अंकांनी हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. आरोग्य, ज्योतिष्य, रहस्यकथा, चित्रपट, पर्यटन,अध्यात्मिक, पापपूर्ती आदी विविध विषयांना वाहलेले एवढेच नव्हे तर विद्यर्थी, मुले, कामगार, कष्टकरी असे कोणत्याही स्तरातील स्वतंत्र अंक प्रकाशित होऊ लागले आहे. ललित साहित्य, वैचारिक आणि पुरोगामी साहित्याच्या अंकांपेक्षाही आरोग्य, ज्योतिष्य आणि आध्यात्मिक विषयाच्या दिवाळी अंकांचा खप दरवर्षी वाढत असल्याचे किशोर पांडे यांनी सांगितले.

दैनिकांमधिल लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, साप्ताहिक सकाळ, लोकमतचा दिपोत्सव, केसरी, सामना, पुढारी याच बरोबर साप्ताहिक साहित्यामध्ये चित्रलेखा, लोकप्रभा यांची दिवाळी अंकांत वेगवेगळया विषयांची मांडणी केली आहे. शेतीविषयक अ‍ॅग्रोवन, उद्योजक यांचे दिवाळी अंक बाजारात आले आहे.

विनोदी अंकांचा बादशाह आवाज, जत्रा, हासवंती, फिरकी, शामसुंदर हे अंकंही आले आहेत. तसेच आरोग्यासाठी  घरचा वैद्य, डायबेटीज मित्र, आरोग्य ज्ञानेश्वरी हे अंकंही आले आहेत. श्रीरामपूर येथील विनोदी अंक प्रकाश कुलथे यांचा वल्र्ड सामना यावेळी अवघ्या शंभर रुपयात आहे. यास मागणी चांगली आहे. तसेच  सुमती लांडे यांचे शब्दालय प्रकाशन यांनाही मागणी चांगली आहे. सर्व प्रकारचे दिवाळी अंक पांडे बंधु यांच्या स्टॉलवर विक्रिसाठी उपलब्ध आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post