साईकिरण टाइम्स ब्युरो, 1 ऑगस्ट 2020
बेलापूर (प्रतिनिधी ) ५०० वर्षापासून आपल्या सर्वांच्या श्रध्देचा भाग असणाऱ्या प्रभू श्रीराम मंदिराच्या कामास सुरुवात होत असुन, बेलापूरकराच्या नव्हे नगर जिल्ह्याच्या दृष्टीने हा एक आनंदाचा क्षण आहे; कारण आपल्या भूमिपुत्रास हा सन्मान मिळत आहे, असे मत पंडीत महेश व्यास यांनी व्यक्त केले.
श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे दि 5 ऑगस्ट रोजी मंदिर निर्माण कार्याचा शुभारंभ अखंड भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी व बेलापुरचे भूमीपुत्र प.पू.स्वामी श्रीगोविंददेवगिरीजी महाराज व देवगडचे महंत पू श्री भास्करगिरिजी महाराज यांच्या उपस्थितीत होत आहे. भूमीपूजनासाठी बिल्वतीर्थाचे पाणी व श्रीहरिहर केशव गोविंद ऊक्कलगाव बन व बेलापूर बु! अशा त्रिस्थळीची माती पुणे येथे पाठविण्यात आली.
बेलापूरातील कारसेवक श्री दिलीप काळे रामप्रसाद व्यास गजानन डावरे व नटवरलाल सोमाणी यांच्या हस्ते त्रीस्थळीचे तिर्थ व मातीचे पुजन करण्यात आले. त्याप्रसंगी पूजनीय श्री महेशजी व्यास जि प सदस्य शरद नवले उपसरपंच रविंद्र खटोड शहर भा ज प उपाध्यक्ष ओमप्रकाश व्यास रामनाथजी शिंदे शेखर डावरे मुन्ना खरात किराणा व्यापारी संघटनेचे प्रशांत लढ्ढा, गोशाळा सचिव राजेंद्र शर्मा, विशाल मेहेत्रे, लक्ष्मण शिंदे, पत्रकार देविदास देसाई, दिलीप दायमा, विष्णुपंत डावरे अतिश देसर्डा, सोमनाथ राशिनकर आदी उपस्थित होते.