साईकिरण टाइम्स ब्युरो, 2 जुलै 2020
श्रीरामपूर | पेट्रोल-डिझेल इंधनामध्ये मोठ्या प्रमाणात दरवाढ केली असून ती मागे घेण्याची मागणी आम आदमी पार्टीने केली आहे. तहसीलदार यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना निवेदन पाठवण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारी मुळे जनता त्रस्त आहे लाखो लोकांना रोजगार बुडाले आहे अनेकांना नोकऱ्या नाही. उद्योगधंदे अजून काही प्रमाणात चालू झालेले नाही. बाजारपेठ पूर्णपणे ठप्प झालेली आहे. हातावर काम करणाऱ्या लोकांना काम राहिलेले नाही. अशा कठीण प्रसंगी पेट्रोल-डिझेलच्या महामारी आणखी एक संकट वाढले आहे ७ जून २०२० पासून इंधनाच्या दरात रोज वाढ होत. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाची किंमत कमी असल्याने सामान्य जनतेला लाभ देण्याचे शक्य असतानाही हे सरकार भरमसाठ पैसे गोळा करीत आहे. हे सरकारी की सावकारे हेच कळत नाहीये , सर्वसामान्य जनता संकटात असून जातीने लक्ष घालून पेट्रोल -डिझेलचे दर कमी करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली.
याप्रसंगी उत्तर नगर जिल्हाध्यक्ष तिलक डुंगरवाल, तालुका अध्यक्ष विकास डेंगळे, उत्तर जिल्हा प्रवक्ता प्रवीण जमदाडे, शहराध्यक्ष प्रताप राठोड, किशोर खरात,उपशहर अध्यक्ष किशोर वाडीले, अक्षय कुमावत, राज मोहम्मद शेख, भरत डेंगळे, राहुल रणपिसे, सलीम शेख, दीपक परदेशी, गौतम राऊत, राहुल केदार, आदि सोशल डिस्टंसिंगचे पालन करून उपस्थित होते.