साईकिरण टाइम्स ब्युरो, 6 जुलै 2020
बेलापूर ( प्रतिनिधी ) करोनाचा रुग्ण आढळलेला २०० मीटरचा परिसर पुर्णपणे सिलबंद करण्याच्या सुचना उपविभागीय अधिकारी अनिल पवार यांनी दिल्या असुन बेलापूरगाव चार दिवस कडेकोट बंद ठेवण्याचा निर्णय करोना कमिटीच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला आहे.
करोनाचा रुग्ण आढळलेल्या परिसराची उपविभागीय अधिकारी अनिल पवार तहसीलदार प्रशांत पाटील पहाणी केली. यावेळी बंद करण्यात आलेल्या परिसरातून नागरीक ये जा करत असल्याचे निदर्शनास आले असता हा परिसर पुर्णपणे सिल करु एकाही व्यक्तीस बाहेर पडू देवु नका. परिसरातील सर्वांची आरोग्य तपासणी करा. गावात फवारणी करा त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वारंटाईन करा, अशा सुचना प्रांताधिकारी अनिल पवार व तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिल्या. यावेळी कामगार तलाठी कैलास खाडे, पोलीस नाईक रामेश्वर ढोकणे, राशिनकर निखील, तमनर पोपट, भोईटे हरिष, पानसंबळ ग्रामसेवक सग्रांम चांडे, पोलीस पाटील अशोक प्रधान, वैद्यकीय अधिकारी देविदास चोखर उपस्थित होते.
यावेळी परिसरातील साडेचारशे कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्यात आली. असून संपर्कात आलेल्या सात जणांना क्वारंटाईन करण्यात आल्याचे आरोग्य अधिकारी डाँ .चोखर यांनी सांगितले तसेच सांबधित रुग्णच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतंःहुन आरोग्य तपासणी करुन घ्यावी, असे अवाहनही डाँ चोखर यांनी केले आहे. दरम्यान, ग्रामविकास अधिकारी संग्राम चांडे यांनी करोना समितीची तातडीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत चार दिवस गाव पुर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच गावातील नागरीकांची आरोग्य तपासणी करावी गावात फवारणी करण्यात यावी जे नियम पाळणार नाही त्यांचेवर कायदेशीर कारवाई करावी बाहेर गावाहुन आलेल्या व्यक्तीची नोंद करावी बैठकीत ठरलेल्या विषयावर तातडीने कारवाई झाली पाहीजे असे सर्वानुमते ठरविण्यात आले. या बैठकीस जिल्हा परिषद सदस्य शरद नवले पंचायत समिती सदस्य अरुण पा नाईक सरपंच राधाताई बोंबले उपसरपंच रविंद्र खटोड भरत साळुंके अभिषेक खंडागळे पोलीस पाटील अशोक प्रधान सुनिल मुथा पत्रकार देविदास देसाई अशोक गवते गोविंद वाबळे प्रशांत लढ्ढा शांतीलाल हिरण राजेश खटोड अशोक पवार प्रफुल्ल डावरे विशाल आंबेकर प्रविण बाठीया चन्द्रंकात नाईक आदि उपस्थित होते.