महेवीश पठाणला संस्कृत मध्ये 99 गुण

साईकिरण टाइम्स ब्युरो, 30 जुलै 2020
श्रीरामपूर (प्रतिनिधी) येथील शा. ज.पाटणी विद्यालयातील विद्यार्थिनी कु. महेवीश रफिक पठाण हिने 95.20 टक्के गुण मिळवून उज्ज्वल यश संपादन केले . विशेष म्हणजे तिने संस्कृत विषयांमध्ये शंभर पैकी 99 गुण मिळवून संस्कृत मधील आपले प्रभुत्व सिद्ध केले. 

                  कुमारी महेविश ही खासदार गोविंदराव आदिक उर्दू हायस्कूलचे शिक्षक रफिक पठाण व गणेश नगर उर्दू शाळेच्या शिक्षिका नफिसा पठाण यांची सुकन्या आहे . घरामध्ये सर्व उर्दूचे वातावरण असताना संस्कृत मध्ये तिने मिळवलेले यश हे दैदिप्यमान असे आहे . श्रीरामपूर शहरामध्ये 95.20 टक्के गुण मिळविणारी ती  श्रीरामपूर मुस्लिम समाजातील पहिली विद्यार्थिनी आहे.

             तिच्या या उज्वल यशाबद्दल नगराध्यक्षा अनुराधा आदिक, उपनगराध्यक्ष करण ससाणे,हिंद सेवा मंडळाचे सचिव संजय जोशी, अशोक उपाध्ये,शिक्षक बँकेचे संचालक सलीमखान पठाण, शिक्षण विस्ताराधिकारी रमजान पठाण,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रज्जाक पठाण, फिरोज पठाण, गट शिक्षणाधिकारी सुनिल सूर्यवंशी, प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर पटारे,शाळेच्या मुख्याध्यापिका तागड मॅडम, सचिन मुळे,वर्ग शिक्षक जेजुरकर व शाळेच्या सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post