साईकिरण टाइम्स ब्युरो, 13 जुलै 2020
श्रीरामपुर | श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर दोन भाग 3 ते 18 जुलै पर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून घोषित झाले आहे. कँटनमेंट झोन घोषित झाल्यामुळे या भागातील सर्व रस्ते प्रशासनाने सील केले आहे. त्यामुळे भागातील सर्व छोटे मोठे व्यावसायीक जे आपले पोट भरत आहे त्यांचे काम बंद आहे. ज्या लोकांचे उत्पन्नाची साधने वार्ड नंबर 2 भाग सोडून इतर ठिकाणी इतर भागात असल्यामुळे त्यांना कामावर जाता येत नाही. यातील बरेच लोक रोज कमवतात व खातात. अशा गोरगरिबांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन समाजवादी पार्टीचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष जोएब युनुस जमादार यांनी केले आहे.
आठ ते दहा दिवसांपासून त्यांच्याजवळ जमा रक्कम होती ती ते खर्च करून बसले आहेत. उत्पन्नाचे साधन नाही, खायला तर रोजच लागणार मग दुसर्यांकडून उसने घेऊन पण किती घेणार त्यालासुद्धा मर्यादा आहेत. भागातील लोकप्रतिनिधी व नेते जे निवडणुकीच्या वेळी लोकांच्या घरी जाऊन विचारायचे की काय पाहिजे असेल तर सांगा ते आज कुठे दिसत नाही. तरी मी एक सामान्य नागरिक या नात्याने भागातील लोकप्रतिनिधी व दानशूरांना आवाहन करतो की, त्यांनी जे लोक रोज काम करुन खातात ज्यांचे उत्पन्नाचे स्रोत दुसरे कोणते नाही, अशा गोरगरिबांना आपण मदतीचा हात देऊन माणुसकीचे दर्शन द्यावे. असे समाजवादी पार्टीचे उत्तर जिल्हाध्यक्ष जोएब युनुस जमादार यांनी आवाहन केले आहे.