होमिओपॅथिक फोरम तर्फे वॉर्ड नंबर 2 मध्ये मोफत औषध वाटप

साईकिरण टाइम्स ब्युरो, 12 जुलै 2020
श्रीरामपूर (प्रतिनिधी) इंडियन होमिओपॅथिक फोरमतर्फे शहरातील वार्ड नंबर दोन या प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप तसेच रुग्णांची तपासणी शिबीर नगरपालिका शाळा क्रमांक पाच येथे संपन्न झाले.

           शिबिराचे उद्घाटन तहसीलदार प्रशांत पाटील व तालुका आरोग्य आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले . होमिओपॅथिक फोरमचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र श्रीमाळी, सचिव डॉ.प्रशांत गंगवाल, सदस्य डॉ. रियाज पटेल, डॉ.सचिन मुसमाडे, डॉ. सोमनाथ गोपाळ घरे, डॉ. सुनिता व्यवहारे, डॉ. सुरज थोरात, डॉ.हीना पटेल, डॉ. जितेश बोरा, डॉ. आशिष जयस्वाल, डॉ . भूषण गंगवाल, डॉ. भारती पांडे, डॉ. अरबाज पठाण, डॉ. मंगेश चौधरीआदींनी रुग्णांची तपासणी करून त्यांना औषधे दिली .त्यानंतर सर्व आशा सेविकांनी वार्ड नंबर 2 मधील घरोघरी जाऊन साडेचार हजार लोकांना औषधांचे वाटप केले.

                या शिबिरासाठी उम्मती फाऊंडेशनचे सोहेल बारूद वाला, डॉ. मुजाहिद सय्यद, डॉ.शफी शेख, अॅड समीन बागवान, शरीफ शेख, डॉक्टर सुदर्शन, अश्फाक शेख, जावेद शेख आदींनी स्वयंसेवकांची सेवा उपलब्ध करून दिली. मुख्याध्यापक सलीमखान पठाण, परवीन शेख, शिक्षक अलताफ शाह, आसिफ मुर्तुजा, निशात पठाण,एजाज चौधरी यांनी शाळेतर्फे सुविधा उपलब्ध करून दिल्या .शिबिरास नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला.
सरकारी दवाखान्याच्या सिस्टर एस के त्रिभुवन, सीमा भोसले, छाया चित्ते, सीमा भोसले,आयेशा पठाण, जया धीवर, एस वाय त्रिभुवन, रेणुका गायकवाड, बुगदे मॅडम, आशा सेविका अनिता साळुंखे, मुक्ता गवळी, ज्योती बिडवे,शहनाज मिर्झा, समीना शेख, रुबीना शेख, हिना पठाण, तरन्नुम खान, किशोर बत्तीसे आदींनी या शिबिरासाठी मोलाचे योगदान दिले. इंडियन होमिओपॅथिक फोरमने सदरचे औषध वाटप शिबीर आयोजित करून या भागातील नागरिकांना covid-19 औषध उपलब्ध करून मोफत तपासणी करून दिल्याबद्दल नगरसेवक अंजुमभाई शेख, मुजफ्फर शेख, मुक्तार शाह, रईस जहागीरदार, अल्तमश पटेल ,कलीम कुरेशी आदींनी होमिओपॅथिक फोरमला धन्यवाद दिले .

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post