अंतिम वर्षातील शेवटच्या सेमिस्टर परीक्षा रद्द

साईकिरण टाइम्स ब्युरो, 26 जून 2020
मुंबई | अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या शेवटच्या सेमिस्टरच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यामध्ये राज्य सरकारनं व्यावसायिक आणि गैर – व्यावसायिक कोर्स करणाऱ्या अंतिम वर्षातील शेवटची सेमिस्टर करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात येत असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.


             कोरोना वाढता धोका लक्षात घेऊन राज्य सरकारनं विद्यांर्थ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळ मार्च महिन्यात दहावी-बारावीचे शेवटचे पेपर स्थगित करण्यात आले होते. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन दहावी-बारावीच्या उर्वरित परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार की नाही याबाबत चर्चा होती.

               मुख्यमंत्री कार्यालयाकडून या परीक्षांसदर्भात ट्विट करून परीक्षा रद्द केल्याची महिती देण्यात आली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत महिती देताना म्हटले होते की, अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी देता येईल. ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांनी लिहून द्यावे, त्यांची परीक्षा घेतली जाईल. कोव्हिडची परिस्थिती लक्षात घेऊन या परीक्षा घेता येतील, असे सामंत म्हणाले होते. तसेच अव्यावसायिक अभ्यासक्रमाची परीक्षा घेतली जाणार नाही. विद्यार्थ्यांना हवी असल्यास ऐच्छिक परीक्षा घेतली जाईल असेही त्यांनी नमूद केले होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post