घोडेगाव (दादा दरंदले) लग्न म्हटलं की वऱ्हाडी मंडळींचा हार, तुरे ,फेटे आदींनी सन्मान करणे ही नित्याचीच बाब झाली आहे. परंतु जगावर व राज्यावर आलेले कोरोना (covid19) चे संकटात 80 दिवसाच्या लॉकडाउन काळात मोठ्या विवाहास असलेली बंदी व काळाची गरज ओळखत नेवासा तालुक्यातील लोहोगाव येथील भाऊसाहेब राजळे मा सरपंच लोहोगाव ता नेवासा यांची नात चि.सौ. का कोमल व देवळाली प्रवरा ता राहुरी येथील जगन्नाथ वरखडे आदर्श शेतकरी यांचे पुतणे चि. दीपक यांचा शुभविवाह यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या संकल्प साध्या विवाहाचा या आवाहनास प्रतिसाद देत दोन्ही परीवारांनी सोशल डिस्टन्सचे काटेकोर पालन करत गुरूवार दि 11 जुन 2020 रोजी मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थीतीत अगदी साध्या पद्धतीने करत मा प्रशांत गडाख अध्यक्ष यशवंत सामाजिक प्रतिष्ठान यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या लोहोगाव ता नेवासा येथील यशवंत सार्वजनिक वाचनालयास 105 विविध कृषी,शैक्षणिक, ऐतिहासिक, सामाजिक कला क्रीडा या विषयांवरील पुस्तके सुनील गडाख सभापती अर्थ व पशुसंवर्धन नगर यांचे हस्ते बन्सी ढेरे,रामनाथ कल्हापुरे, सोपान ढेरे पोलीस पाटील,भास्करराव जाधव,संजय ढेरे उपसरपंच,निसार सय्यद,बाप्पू कल्हापुरे यांचेकडे सुपूर्द करण्यात आले.
यावेळी दोन्ही परिवाराच्या वतीने इतर खर्च टाळत आप आपल्या परीने विवाहप्रसंगी पुस्तक भेटीचा उपक्रम व साध्या विवाहाचा उपक्रम राबवावा असे आवाहन करण्यात आले तसेच यावेळी उपस्थित अतिथींना यांना मास्क व सॅनिटायझर भेट देण्यात आले.
प्रशांत गडाख यांनी सुरू केलेला गाव तिथे वाचनालय व संकल्प सध्या विवाहाचा हा उपक्रम खऱ्या अर्थाने समाजउपयोगी आहे यातुन प्रेरणा घेत आम्ही दोन्ही कुटूंबानी लग्न सध्या पद्धतीने करत गावातीलच वाचनालयास 105 पुस्तके भेट दिली.यापुढेही आम्ही आमच्या नातेवाईक मंडळींचे विवाह साध्या पद्धतीने करत अनावश्यक खर्च टाळनार आहोत.
-- भाऊसाहेब राजळे, वधूचे आजोबा, मा सरपंच लोहोगाव, ता - नेवासा.