बेलापूरात नियमांचा उडाला फज्जा ; तोंडाला मुखपट्टी नाही... सामाजिक अंतर पथ्याचे पालन नाही...अनेक दुकानात सॅनिटायझर नाही...; प्रशासन कारवाई करणार का???

साईकिरण टाइम्स ब्युरो, 27 जून 2020
बेलापूर | प्रतिनिधी | श्रीरामपूर तालुक्यातील महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या बेलापूर गावात छोट्या व्यवसायीकांना काही नियम व अटी-शर्तीवर दुकाने व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असली, तरी सर्व नियम धाब्यावर बसवुन व्यवसाय केले जात आहेत. अनेक व्यावसायिकांच्या तोंडाला मुखपट्टी नाही. दुकानात सॅनिटायझर नाही. सामाजिक अंतर पथ्याचे कुठलंही पालन केले जात नाही. गावात अनेक नागरिक विनाकारण फिरतात. नियमांची ऐसीतैसी करणाऱ्यांवर प्रशासन कारवाई करणार का?? असा, सवाल उपस्थित होत आहे. 

            त्यातच, कोरोना बाधीत व्यक्तीचे नातेवाईक बेलापूरात असुन ती व्यक्त नातेवाईकाकडे आल्याची जोरदार चर्चा गावात पसरली असुन सबंधीताकडे वैद्यकीय अधीकारी व कोरोना पथक जावून आले असल्याचे समजते. या चर्चेमुळे नागरीकात भितीचे वातावरण पसरले आहे. तसेच बेलापूरात छोट्या मोठ्या व्यवसायीकांना काही नियम व अटीच्या शर्तीवर दुकाने चालू करण्यास परवानगी दिली असली तरी व्यवसाय करणाराच्या तोंडाला मास्कच नाही.. ना दुकानात सँनिटायझर... गावात अनेक नागरीक विनाकारण फिरताना दिसत असुन कुणाच्याही तोंडाला मास्क लावलेले नाही. ना सोशल डिस्टनचे पालन... त्यामुळे, बेलापूरकरांचा जीव  टांगणीला लागला आहे. या सर्वावर कोण नियंत्रण ठेवणार?? कोरोना कमीटी कुठे गेली??  असा सवाल ग्रामस्थाकडून विचारला जात असुन तोंडाला मास्क नसणाऱ्या  नागरीकावर ग्रामपंचायतीने दंडात्मक कारवाई  करावी, तसेच जे व्यवसायीक नियम पाळत नाही त्याचेवरही कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post