Shrirampur : सारिया शेख हिचा रमजानचा उपास यशस्वीपणे संपन्न

साईकिरण टाइम्स ब्युरो, 20 मे 2020
टिळकनगर (वार्ताहर) श्रीरामपूर तालुक्यातील टिळकनगर येथील सारिया शेख  वय 5 या लहान चिमुरडीने  रमजान महिन्याचा उपास यशस्वीपणे पार पडला.

           इस्लाम धर्माचा अत्यंत पवित्र मानला जाणारा रमजान महिना अंतिम टप्प्यात सुरू आहे. मुस्लिम बांधव भल्या पहाटेच रोजा ठेवतात. सकाळ पासून संध्याकाळपर्यंत पाणी व अन्न काहीही न घेता, समाजात भूकेलेले व तहानलेल्यांना येणाऱ्या अनुभवाची प्रचिती होती. अल्लाहकडे आपल्या भारत देशाची  समस्त मानव जातीची करोना विषाणूजन्य रोगापासून सुटका व्हावी , कोणीही उपाशी  राहू नये यासाठी या चिमुरडीने प्रार्थना केली.

           चालू वर्षी अत्यंत कडक उन्हाळ्यात उपास सुरू झाल्याने उपासकांची मोठी कसरत होत आहे. त्यामध्ये या लहान चिमुरडीने उपास ठेऊन सर्वांना आश्चर्यचकीत केले आहे. सारिया अंगणवाडी सेविका नगमा शेख ह्यांची कन्या आहे. उपास यशस्वी पार पडला म्हणून सारीयाचे  सर्व स्थरातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post