साईकिरण टाइम्स ब्युरो, 15 मे 2020
उक्कलगाव | प्रतिनिधी | श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर रोडलगतच्या गायकवाड वस्ती शिवारातील दत्तात्रय सोनवणे यांच्या
शेतीत असणाऱ्या विहिरीत बिबटया पडला. दरम्यान,शुक्रवारी (दि.15) सकाळी बिबटया विहिरीत पडल्याचे समजताच वानविभागाच्या कर्मचाऱ्यांना कळविण्यात आले.
शुक्रवारी (दि.15) सकाळी सोनवणे हे शेताकडे गेले असता विहीरीच्या बाजुने बिबटयाचा डरकाळीचा आवाज ऐकू आला. त्यांनी विहीरीकडे जावून जात पाहिले असता त्यांना बिबटया विहिरीत पडल्याचे दिसले. दत्तात्रय सोनवणे यांनी विलंब न करता वनाधिकारी यांना घडलेला प्रकार त्यांच्या कानावर घातला. दरम्यान, वनक्षेत्रपाल संतोष जाधव, वनसंरक्षक गाढे, विकास पवार, वनमंजूर लांडे यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विहिरीत पिंजरा टाकून बिबटयाला सुखरुप बाहेर काढत जेरबंद केले. बिबटयाला रोपवाटिकेत रवानगी करण्यात आली.
श्रीरामपूर परिसरातील घटना ताजी असतानाच उक्कलगाव मध्ये बिबटयाने धनवाट परिसरातील तावरे वस्तीवर असणार्या बिबटयाने धुमाकुळ घालत पांडुरंग भिकाजी थोरात यांच्या तीन महिन्याच्या कालवडीचा बिबटयाने फडशा पाडला शेजारीच असणार्या दागाडात कालवडीचा फडशा पाडला.सदरची घटना गुरुवारी ( दि.14) रोजी रात्री 12 वाजेच्या सुमारास श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव धनवाट रस्ता शिवारातील तावरे वस्ती नजीक घडली. शेतकरी पांडुरंग थोरात यांनी वनधिकाऱ्यांच्या कानावर घडलेला प्रसंग सांगितला असुन वनविभागाचे लांडे घटनास्थळी जात कालवडीचा पंचनामा केला. संबधित अधिकाऱ्याला शेतकर्यांनी या धनवाट परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्याने येथे वावर असल्याने या ठिकाणी नवीन पिंजरे लावण्यात यावे अशी मागणी केली.