साईकिरण टाइम्स ब्युरो, 11 मे 2020
उक्कलगाव | प्रतिनिधी | मुंबई(अंधेरी) येथुन आलेल्या एकाला जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करून विलगीकरण कक्षात रवागणी करण्यात आली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगावसह सर्व गावामध्ये स्थापन केलेल्या कोरोना ग्रामसुरक्षा समितीवर बोहरुन आलेल्या तालुका स्तरावरून आणि बाहेरील गावावरून आलेल्या प्रत्येक नागरिकांना विलगीकरण कक्षात ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
जर कोणी बाहेरून गावावरून आल्यास जि प शाळा येथे व्यवस्था करण्यात आली त्यामुळे क्वारंटाईन केलेल्या जि प शाळा येथे आलेल्या लोकांसाठी सुविधा उपलब्ध नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मुंबर्ई अंधेरी येथून आलेल्या एकास क्वारंटाईन करण्यात आले ; परंतु या लोकांना प्यायला पाणी नाही. सुविधांचा अभाव असल्यामुळे नापसंती व्यक्त करण्यात आली. जर अशाच प्रकारे आरोग्य विभागाने तालूका स्तरावरून आलेल्या व्यक्तीना होम क्वारंटाईन करण्यात आले सॅनिटायझर व हात धुवायला मुलबक पाण्याची व्यवस्था करणे अत्यावश्यक आहे. विलगीकरण कक्षाची जबाबदारी ग्रामसुरक्षा समितीवर आहे. बेलापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डाॅ चोखर,उक्कलगाव मधील उपकेंद्राचे नवीनच रुजू झालेले डाॅ पठाण,आरोग्यसेवक किरण दळवी,यांच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात आले.