साईकिरण टाइम्स ब्युरो, 21 मे 2020
टिळकनगर (वार्ताहर) कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य, गरजू व्यक्तींच्या हाथाला काम नसल्याने दत्तनगर येथील कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. अशा अडचणीच्या परिस्थितीत पंचायत समितीच्या सभापती संगीता ताई शिंदे, ग्रामपंचायत सदस्य, नानासाहेब शिंदे मित्रमंडळ, मैत्री ग्रुपच्या सहकार्याने व राज्याचे माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रेरणेने दत्तनगर परिसरातील सुमारे दोन हजार कुटुंब व पाच हजार व्यक्तींना दहा दिवस मोफत घरपोहोच अन्नदान उपक्रम राबविण्यात आला. जवळजवळ पन्नास हजार गरजूंनी याचा लाभ घेतला.
आपले बंधू रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असतांना व त्यांच्या निधनानंतरही दुःख उराशी बाळगून शिंदे कुटुंबियांनी अन्नदानाचा उपक्रम चालूच ठेवला. त्यामुळे खऱ्या अर्थाने म्हणावेसे वाटते की दिन भुकेला दिसता कोणी घास त्यांच्या मुखी घालूनी दुःख नेत्रीचे घेता पिऊनी फोडी पाझर पापणाला. दत्तनगर आपले कुटुंब आहे. लोकप्रतिनिधी हा जनतेचा खऱ्या अर्थाने पालक असतो. अडचणीच्या काळात गरजू व्यक्तीच्या पाठीशी उभे राहिले ह्या सदभावणेने हे अन्नदान सुरू केले असे नानासाहेब शिंदे यांनी सांगितले. प्रत्येकदिवशी जेवणात वेगळा पदार्थ देण्यात आले. मसालेभात, मिक्स भाजी, लाफशि, आमटी, बुंदी असे पदार्थ वाटप करण्यात आले. यावेळी तालुक्यातील अनेक मान्यवरांनी भेटी देऊन उपक्रमाचे कौतुक केले.
याकामी पंचायत समितीच्या सभापती संगीताताई शिंदे, माजी उपसरपंच नानासाहेब शिंदे, उद्योजक नंदकुमार शिंदे, बापूशेठ शिंदे, माजी सरपंच पी. एस. निकम, तंटामुक्तीचे अध्यक्ष रवींद्र गायकवाड, आर.पी. आयचे जिल्हाप्रमुख भीमराज बागुल, टिळकनगर कामगार पतपेढीचे अध्यक्ष बाळासाहेब विघे, युवा नेते सागर भोसले, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप गायकवाड, जनार्धन खाजेकर, मोहन आव्हाड, अरुण वाघमारे, राहुल पठारे, संजय जगताप, संदीप बागुल, बाळासाहेब बत्तीसे, संजय थोरात, राजू खाजेकर, पंकज बागुल, सुनील बोरगे, बाबासाहेब जाधव,सतीश ब्राह्मणे, विश्वास भोसले, अभिजित तेलोरे, राजू त्रिभुवन, राजू सोज्वळ, राधाकीसन वाघमारे, अरुण बागुल, पत्रकार लालमोहमद जहागीरदार, राजेंद्र गायकवाड, डॉ. सुधीर ब्राह्मणे,संजय कोळगे, शरद भणगे, अनिल पटेल, रतन परदेशी, प्रीतम मंत्री, बाळासाहेब सैदाने, बाळासाहेब जोशी आदींसह ग्रामस्थ, दानशूर व्यक्तीचे सहकार्य लाभले.