Rahuri : नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी संदिप वाघचौरे, उपाध्यक्षपदी जयेश वाघचौरे


साईकिरण टाइम्स ब्युरो, 21 मे 2020
सात्रळ | बाबासाहेब वाघचौरे | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन नियमांचे व तहसीलदार राहुरी यांच्या आदेशाचे पालन करत राहुरी तालुक्यातील सात्रळ ,सोनगाव,धानोरे,पंचक्रोशी मध्ये व्हाटसअप ग्रुपच्या आधारे सर्वानुमते श्री.संत सेना महाराज नाभिक संघटना पंचक्रोषी  अध्यक्षपदी श्री.संदीप वाघचौरे यांची निवड करण्यात आली.

           तर कामाची व्याप्ती व संघटनेच्या कामकाजास हातभार लावण्याच्या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते शिवसेना उपतालुका प्रमुख श्री.जयेश वाघचौरे यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यावेळी संघटनेचे सर्व माजीअध्यक्ष व सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली व्हाटसअॕप ग्रुपवरच ही निवड प्रक्रीया पार पाडण्यात आली.

          यावेळी विजय वाघचौरे, सुरेश वाघचौरे,पत्रकार अनिल वाघचौरे, नंदकुमार वाघचौरे, पांडुरंग बोरुडे, जनार्दन वाघचौरे, आसाराम वाघ,पत्रकार बाबासाहेब वाघचौरे,शेखर मदने,पत्रकार समर्थ वाघचौरे, अमित वाघचौरे, विकास वाघचौरे,सोमेश वाघचौरे, योगेश वाघचौरे, गोकुळ वाघचौरे, भाऊसाहेब वाघचौरे,दत्तात्रय मदने,सोमनाथ वाघचौरे,आकाश वाघचौरे,अरुण वाघ,केशव वाघचौरे,शिवाजी वाघचौरे,विजय कोरडे,सुनिल वाघचौरे, वाल्मीक वाघचौरे,प्रशांत वाघचौरे,संतोष वाघचौरे,प्रशांत वाघचौरे, अॅड.भुलेश्वर बोरुडे,संतोष चौधरी,कृष्णा वैद्य, राजेंद्र वाघचौरे, किरण वाघचौरे, बाळकृष्ण वाघचौरे, संदीप वखरे,महेश वाघचौरे, गोरक्ष वाघचौरे, श्रीराम वाघचौरे, जालिंदर वाघचौरे, विलास जाधव , मधुकर वाघचौरे,निलेश वाघचौरे, संजय वाघचौरे, मनोज वाघचौरे, सर्वांच्या सहमतीने हि निवड व्हॉट्सअॕप ग्रुपवरुनच करण्यात आली.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post