Shrirampur : स्व.जयंतराव ससाणे मित्र मंडळाच्या वतीने विलिगिकरण कक्षाकरीता १०० जीवनावश्यक वस्तूंचे किट सुपूर्द

श्रीरामपूर प्रशासनाचे आवाहन; आणि करण ससाणेंची कार्य तत्परता
साईकिरण टाइम्स ब्युरो, 8 एप्रिल 2020
श्रीरामपूर|श्रीरामपूर तालुक्याचे भाग्यविधाते माजी आमदार स्व. जयंतराव ससाणे मित्र मंडळाच्या वतीने श्रीरामपुरात विलीगिकरण कक्षाकरीता येणाऱ्या रुग्णांसाठी जीवनावश्यक वस्तूंच्या १०० किट युवा नेते तथा उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी प्रांताधिकारी अनिल पवार यांच्याकडे सुपूर्द केले आहे.

            सध्या जगभरासह सर्वत्र कोरोना आजाराने धुमाकूळ घातला आहे महाराष्ट्रात आणि विशेष करुन आपल्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणावर शिरकाव केला आहे आणि श्रीरामपुरात देखील एक रुग्ण सापडल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.  त्यामुळे प्रशासनाने श्रीरामपुरात विलिगिकरण कक्ष उभारण्याचे काम सुरु केले आहे. 

  तहसीलदारांचा मॅसेज आणि करण ससाणेंची कार्य तत्परता...
         दोन दिवसांपूर्वी तहसीलदार प्रशांत पाटील यांनी प्रशासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या विलिगिकरण कक्षाकरिता १०० जीवनावश्यक वस्तूंच्या किटची आवश्यकता असल्याचा मॅसेज व्हाट्सएपच्या एका ग्रुपवर  टाकला आणि त्यावर करण ससाणे यांनी लगेचच माजी आमदार स्व. जयंतराव ससाणे साहेब मित्र मंडळाच्या वतीने १०० किट तयार करण्याचा निर्णय घेतला आणि आज सदरच्या किट प्रशासनाच्या सुपूर्द केल्या. यावेळी प्रांताधिकारी अनिल पवार यांनी करण ससाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले आणि ससाणे यांनी दाखवलेल्या कार्य तत्परतेचे कौतुक केले.
    त्याच पार्श्वभूमीवर विलिगिकरण कक्षामध्ये येणाऱ्या रुग्णांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्याचा निर्णय करण ससाणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतला आणि माजी आमदार स्व. जयंतराव ससाणे साहेब मित्रमंडळाच्या वतीने  आज १०० किट प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले.  सदर किटमध्ये बेडशीट, चप्पल जोडी, जेवणाचे ताट, सेनीटायझर, डेटॉल साबण, कपड्याची साबण, टूथ पेस्ट, ब्रश, शॅम्पो, टॉवेल, दोन रुमाल आणि तीन जोड वॉशेबल मास्क अश्या प्रकारचे १०० किट तयार करुन देण्यात आले. 

        यावेळी करण ससाणे म्हणाले की, आपण समाज्याचे देणं लागतो आज ह्या कठिण प्रसंगाला एकजुटीने सामोरे जात आहोत. सर्वांनीच आपापल्या परीने जबाबदारी घेणं आवश्यक आहे. स्व.जयंतराव ससाणे साहेबांनी नेहमीच सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून समाजकारण आणि राजकारण केले आहे त्यामुळेच  स्व.जयंतराव ससाणे मित्र मंडळाच्या वतीने  विलिगिकरण कक्षाकरिता जीवनावश्यक वस्तूंच्या किट देण्याचा निर्णय घेतला.  सदरची कल्पना शहराध्यक्ष संजय छल्लारे यांना बोलून दाखविली आणि त्यांनी परिश्रम घेत एकच दिवसात किटसाठी लागणारे साहित्य एकत्रित केले आणि आज सदरचे किट प्रशासनाकडे दिले आहे. ही मदत नाही आमची जबाबदारी असल्याचे ससाणे यांनी बोलून दाखवले.
          यावेळी तहसीलदार प्रशांत पाटील, मार्केट कमिटीचे माजी सभापती सचिन गुजर, पक्षप्रतोत संजय फंड, काँग्रेस तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, शहराध्यक्ष संजय छल्लारे, माऊली प्रतिष्ठानचे ज्ञानेश्वर मुरकुटे उपस्थित होते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post