साईकिरण टाइम्स ब्युरो, 17 एप्रिल 2020
श्रीरामपूर |कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण जगासह आपल्या देशातही थैमान घातले आहे. आज आपला देश कोरोना नावाच्या शत्रू बरोबर दोन हात करत आहे. मजुरी करणारे कामगार, बांधकाम कामगार, तसेच गरीब कुटुंब यांचे खाण्यापिण्याचे हाल होत आहे. ही कोरोना बरोबरची लढाई छोटी आणि सहज जिंकण्यासारखी नाहीये, त्यामुळे आणखी काही दिवस आपल्याला अशाच पद्धतीने सर्वांना मिळून लढावे लागेल, पण यात हातावरील, गोरगरीब, मोलमजुरी करणारे कामगार, कष्टकरी, रोजंदारीवरील नागरिकांना त्रासापासून वाचवण्यासाठी समाजात सक्षम असणारे दानशूर व्यक्तींनी समोर येऊन मदतीचा हात पुढे करावा असे, आवाहन अखिल भारतीय सेनेच्या संस्थापक मा. आ.अरुणभाई गवळी(डॅडी) आणि पक्षाच्या सरचिटणीस सौ.आशाताई गवळी (मम्मी) यांचे वतीने इम्रानभाई शेख यांनी केले आहे.
याप्रसंगी शहराध्यक्ष विजय कावरे, शहर उपाध्यक्ष योगेश गायकवाड, तालुका उपाध्यक्ष अंकुश पवार, तालुका संघटक सुदामराव गायकवाड, शहर कार्याध्यक्ष लखन जाधव यांनी सर्व सक्षम दानशूर व्यक्तींना आवाहन केले आहे.