साईकिरण टाइम्स ब्युरो, 2 एप्रिल 2020
अहमदनगर :पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडून आज ( दि 2) 51 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 6 जण कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 14 झाली आहे. पैकी एकाला यापूर्वीच डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आज पॉझिटिव्ह आलेल्या 6 पैकी त्यात 2 परदेशी, 2 मुकुंदनगर भागातील तर दोन संगमनेर येथील येथील आहेत. परदेशी व्यक्तींपैकी एक इंडोनेशिया आणि दुसरा जिबुटी येथील आहेत. बाधित व्यक्ती १७ ते ६८ वर्षे वयोगटातील अशी, माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेनी दिली आहे.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण करुणा बाधित रुग्णांची संख्या 14 इतकी झाली आहे. प्रशासनाला पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेच्या मार्फत 51 जणांचे अहवाल आज (दि. 2) प्राप्त झाले. या 51 जणांच्या अहवालामध्ये 6 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याचे प्रशासनाने कळविले आहे .यापूर्वी अहमदनगर मध्ये 8 रुग्ण होते त्यापैकी एकाला घरी सोडण्यात आले आहे .