शासकीय कार्यालयात केलेल्या अर्जाच्या सद्यस्थितीची माहिती संदेश प्रणालीने कळवावी
राजेश बोरुडे यांनी केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी
साईकिरण टाइम्स
अहमदनगर | दि. 19 जानेवारी 2020
नागरिकांनी शासकीय कार्यालयात आपल्या कामासाठी केलेल्या आवक जावक पत्राची, अर्जाच्या सध्यास्थितिची माहिती अर्जदाराच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर ( एसएमएस ) संदेश प्रणाली ने सुरू करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे श्रीरामपूर तालुका संपर्कप्रमुख राजेश बोरुडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
राजेश बोरुडे यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे कि, महाराष्ट्रातील प्रत्येक शासकीय कार्यालयात गावपातळी ते मंत्रालयापर्यंत आपल्या कामासाठी नागरिक अर्ज व तक्रारी अर्ज करीत असतात. संबंधित अर्जदारास आपण केलेला अर्ज, तक्रार कोणत्या अधिकार्याचा टेबलवर प्रलंबित आहे. कोणत्या कारणासाठी प्रलंबित आहे हे समजून येत नसते. काही अधिकारी आर्थिक देवाण-घेवाणीसाठी सुद्धा संबधित अर्ज प्रलंबित ठेवत असतात. त्यामुळे सामान्य नागरिकास आपल्या अर्जाची सध्याची स्थिति काय आहे हे कळत नसते. शासकीय कार्यालयात आलेल्या आवक जावक पत्राची सध्यास्थिति अर्जदारच्या मोबाईलवर एसएमएस प्रणाली ने सुरू करावी जेणेकरून सामान्य नागरिकास त्रास सहन करावा लागणार नाही व अधिकारी यांचे टेबलावर आलेले अर्ज प्रलंबित राहणार नाहीत. यातून शासकीय कार्यालयात होणारा भ्रष्टाचार रोखण्यास मदत होईल.
Tags
प्रादेशिक