Shrirampur : उक्कलगाव येथील 'खारा नाला' सारवली बंधाऱ्याचे भूमीपूजन

साईकिरण टाइम्स ब्युरो, 24 मे 2020
उक्कलगाव | प्रतिनिधी |श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे जिल्हा परिषद सदस्या सौ आशाताई बाबासाहेब दिघे यांच्या स्थानिक सेस फंड निधीतून, जिल्हा परिषद अर्थ बांधकाम समितीचे माजी सभापती बाबासाहेब दिघे यांच्या विशेष प्रयत्नाने उक्कलगाव येथील खारा नाला सारवली बंधारा टप्पा -२ बंधाऱ्याचे भूमिपूजन श्रीरामपूर तालुक्याचे आमदार लहु कानडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

        याप्रसंगी मुळा प्रवरा व्हा चेअरमन जी के बकाल, जिल्हा बँकेचे संचालक व उपनगराध्यक्ष करण ससाणे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे  उपसभापती सचिन गुजर, जि प अर्थ बांधकाम समितीचे माजी सभापती बाबासाहेब दिघे ज्ञानेश्वर मुरकुटे,सुधिर नवले, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अरुण पा नाईक जेष्ठ नेते इंद्रनाथ पा थोरात अशोक पवार, पंचायत समितीचे गडदे, पाणी पुरवठा व बांधकाम समितीचे अभियंता पिसे, एजन्सीचे काॅन्ट्क्टर अमोल ढोकचौळे आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते. 

            जिल्हा परिषद सदस्या सौ आशाताई दिघे यांच्या स्थानिक निधीतून धनवाट रस्ता, खंडोबा ते पांढरादेव पटेलवाडी डांबरीकरण, जळकेवाडी रस्ता डांबरीकरण,लम्हाणबाबा रस्ता, उक्कलगाव ते गळनिंब शिवरस्ता, एकलहरे ते आठवाडी रस्ता डांबरीकरण,पाच ठिकाणी सेस निधीतून पथदिवे,आदी कामे यांच्या निधीतून मंजुर झाले असल्याने कामे पूर्ण मार्गी लागले असून एकूण एक कोटी पंधरा लाखाचा निधी उक्कलगाव गणाला दिला आहे तसेच नियोजित कामांमध्ये धनवाट ते शिवरस्ता,सारवली बंधारा टप्पा ३ या कामे मंजुरी मिळालेल्यानंतर हे कामे मार्गी लागणार आहे यावेळी विकास रामदास थोरात, राजाभाऊ थोरात, प्रकाश थोरात शिवाजी थोरात बन्सी भाऊ थोरात प्रकाश जगधने सोमनाथ मोरे पंडीत भाऊ थोरात प्रताप पटारे आदीनी सोशल डिस्टन्सीगचे पालन करत भूमिपूजनचा कार्यक्रम पार पडला. 

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post